भाग १ – प्रवास सुरवात करण्यापूर्वी
दिनांक ७ जानेवारी२०१८ ला मला प्रसाद चा कॉल आला. आपण WE ग्रुप बरोबर संधान दरी ला जाऊया . तर तू येतोस का .. माझा तसा रविवार १४ जानेवारी ला Bombay Stock Exchange च्या मॅरेथॉन ला जायचा ठरला होता त्यासाठी मी तसा रेजिस्ट्रेशन पण केला होता .. मग काय प्रसाद ने आपल्या शैलीत मला तयार केले आणि मला सांगितले कि २१ जानेवारी ला एक मॅरेथॉन आहे ती खूप मोठी मॅरेथॉन आहे तिथे आपण जाऊ .. मग काय त्याच्या ह्या प्रॉमिसवर मी रेडी झालो खरं.. भावा तुझ्यासाठी धन्यवाद पण कमीच आहे .. मग पुढे काय दोन दिवस अगोदरच प्रसाद ने एक वेगळी सामानाची यादी बनवून आम्हाला (मी , दर्शन व महेश) पाठवली. विशेष म्हणजे दरवेळी प्रमाणे ह्या वेळेला सुद्धा त्याने मला २ पाण्याच्या बॉटल घेऊन यायला सांगितले पण मी नेहमी प्रमाणे एकच बॉटल आणली. (सॉरी भावा )
आज वर केलेले गड, किल्ले, धरण,धबधबा , घाट , मंदिर व इतर प्रेक्षणीयस्थळे .. पर्वतारोहण (ट्रेकिंग) किंवा गड किल्ल्याचीभटकंतीचे भूत वेताळा पेक्षा भयंकर..एकदा मानेवर बसले कि बसले ..गडवाटा , आडवाटा कितीही पालथ्याघातल्या तरी थकवा हा तात्पुरता .. काही दिवसानंतर परत तीव्र आठवण .. अशीच एक तीव्र आठवण म्हणजे संधान दरी ..एका अतिप्राचीन जिओग्राफिक फ्रॉन्टलाइन म्हणजेच जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली हिदरी अथवा घळ हा निसर्गाचा अदभूत असा चमत्कार .. संधान दरी २०० ते ४००फूट खोल आणि जवळ जवळ ४ किलोमीटर लांबवर पसरलेली …पावसाळ्यात येथे जाणे अश्यक्य कारणपावसामुळे पाणी साचून यात दरीतून खाली कोसळत. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे हिवाळा ..
शेवटी तो दिवस उजडाला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो .. १२ जानेवारी२०१८ सकाळपासून ऑफिस मध्ये WEग्रुप ने पाठवलेलं संधान वेली ट्रेक चा मेसेज ३ ते ४ वेळा वाचला . तसे मेसेज मध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या नाही हे सांगितले होते .त्याप्रमाणे घरी पोहचल्या वर पॅकिंग करायला घेतले . आवश्यक गोष्टी हवे आहेत ते मात्र सगळे घेतले .. विचार केला परत एकदा यादी वाचावी त्यात प्लेटआणि ग्लास राहिला होता .. मनात विचार आला .. गरजेचं आहे का .. पण तरीही घेतला .. कसे बसे आवरत मी रात्री ९वाजता रेडी होऊन दर्शन च्या बिल्डींगकडे ९.३० ला प्रस्थान केले . एवढी उत्सुकता कि आम्ही ९.५० ला CST कडे निघालो .. आम्ही अक्षरशः १तास अगोदर CST स्टेशन वर पोचलो मग काय आमचे सेलेब्रिटी सेल्फी सेशन चालू झाले ..त्यात आम्हाला १०. ५० ची कसारा फास्टलोकल कधी प्लॅटफॉर्म वर लागली तेकळलंच नाही . मग आम्ही धावत धावत ट्रेन पकडली आणि मग ट्रेन सुरू झाल्यानंतर गणपती बापा मोरया या जय घोषणे संधान वे्ली प्रवास चालू केला .
क्रमश : भाग २ – सुरवात
साधारंण पणे शनिवारी १.४५ ला आम्ही कसारा लापोचलो .मग आम्ही जीपने साम्रद गावकडे प्रस्थान केले . जीप मधील एक गमतीशीर भाग म्हणजे ड्राइवर च्या बाजूला बसलेला माणूस (ड्राइवर चा मित्र) कोणतेच गाणे पूर्ण होऊ देत नसायचा ..सारखा एक कडवा झाला कि गाणं बदलयाचा .. जसा काय तो १९५६ च्या DJ ऑपरेटिंग मशीन वर खेळात होता .. . अशी आमची जीप सर्वात अगोदर निघून सर्वात शेवटी गावात पोचली. मग काय कधी सकाळ झालीते कळलंच नाही .. सकाळच्या नैसर्गिकविधी आटपून चहा नाश्ता केल्यानंतर सर्वजन रिंगण करून Introduction Round साठी उभे राहिले . सकाळी ठीक ८ वाजता ट्रेक ला सुरवात केली . डोळ्यासमोर संधान दरी …दिसल्यावर दडपण आल्यासारखा झाले .. पण जस जसे पुढे जायला लागलो तसे ते दूर झाले . एक वेगळाच साहस – एक वेगळीच उर्मी मनात भरली आणि सह्याद्रीच्या कुशीत बऱ्याच ठिकाणी फिरून मला जाणवलेली एक जाणीव .. आपल्यातला अहंपणा सोडून आपला मन निसर्गाशी एकरूप होत.. तिथला तो दगड धोंड्याचा उंच सखल मार्ग मधेच उंच खडकावरून खाली उडी मारायची .. मधेच भोगद्यासारख्या रचनेतून जायचा.. जस जसे पुढे जावे तसे ते कडे आणखी उंच उंच होत गेले आणि आपण किती लहान आहोत ह्याची जाणीव करून देतात ..
जसे आम्ही पुढे गेलो आम्ही पाण्याच्या पहिल्या पॅच जवळ येऊन पोहचलो. पाणी हे कंबरेच्या वरती होते काहींना तर पाणी छाती पर्यंत लागत होते आणि हा पॅच सांधण च्या बाकी पॅच पेक्षा लांब होता त्यात थंडी असल्या कारणामुळे पाणी हि थंड होते. मला तर पाण्यात उतरण्या आधीच अंगावर शहारे आले होते. मी पाण्यात उतरताच थोडा वेळ स्तब्द उभा राहिलो आणि आम्ही एकमेकांची मदत करत बॅग पास करू लागलो. एका बाजूने दुसऱ्या बाजूला पोहचलो पण अंगावरची थरथरी काही जात नव्हती. कसे बसे स्वतःला सावरत आम्ही पुढे निघालो जस जसे आम्ही पुढे जात होतो तस तसे दरीच्या दोन्ही बाजूचे डोंगर जणू काय आम्हाला कुशीत घेण्यासाठी उभे होते. थोडे अंतर जसे पार केलं आम्हाला डोंगरातून निघणारे सूर्याची कवळी किरणे जणू आम्हांला हाकच मारत होते. आणि ते पहाण्यासाठी माझी झालेली धडपड हे म्हणजे असे झाले की “गरम गरम चहा मध्ये पारले-जी चा बिस्कीट बुडवताच तो तोंडात गेला पाहिजे नाही तर तो चहामध्येच बुडतो ” ! ते पाहिलेले दृश्य हे माझ्या आयुष्यातले कधी न विसरणारा क्षण..
आणखी एक थरारक भाग म्हणजे रॅपलिंग .. तिथे ८० फूट खाली दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत खाली उतरावे लागत .. आणि आम्ही पहिल्या रॅपलिंग पॉईंट वर येऊन पोहोंचलो. तिकडे अगोदरच बाकीच्या ग्रुप चे ट्रेकर्स रॅपलिंग करत होते मी त्यांचे निरीक्षण करत होतो. रॅपलिंग करताना दोन गोष्टी सांगत होते ते म्हणजे दोन पायांच्या मध्ये अंतर आणि कंबरेच्या वरचा भाग हा मागे ठेवायचा. मला हे adventure करायचे होते पण भीती सुद्धा तेवढीच होती हा जर फिरून मागे जावे ते तर शक्यच नव्हते. रॅपलिंग ला सुरुवात झाली मी तसा प्रसाद च्या मागेच होतो मध्ये मध्ये मुलीच्या किंचाळण्याचा आवाज येत होता रॅपलिंग करताना त्या वेळी मला मात्र धडकी भरली होती. प्रसाद चा नंबर आला प्रसाद ने बऱ्या पैकी ठीक केलं.. मला सांगितले बस टेकनिक follow कर. मग माझा नंबर आला मला Harness बेल्ट लावण्यात आला. Harness लावल्या मुळे मनात एक भीती होती ती म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले पडणार तर नाहीच हे मात्र डोक्यामध्ये ठाम करून घ्येतले होते. मला जसे सांगितले त्या प्रमाणे रॅपलिंग चा पहिला पॉईंट पूर्ण केला. खाली उत्तरलो तर मला काहीच सुद्धा वाटले नाही करताना मात्र खूप भारी मज्जा आली हो मी काही तरी नवीन आज केले याचे भान झाले होते. सांधण ची दरी आणि त्यात रॅपलिंग याचा मोह मला आवारत नव्हता. पहिला रॅपलिंग पार्ट .. कधीही न विसरणार तो क्षण… तो पाहिलेला क्षण हे मी माझ्या मनामध्ये घट्ट आणि आठवणी मध्ये साठवून पुढे निघालो.
पहिला रॅपलिंग पॉईंट झाल्यानंतर अजून चार छोटे रॅपलिंग पॉंईंट ग्रुप मधील मित्राच्या साहाय्याने पूर्ण केले . आम्ही सगळे चॊथ्या रॅपलिंग पॉईंट वर आलो. तिकडे रॅपलिंग केल्या नंतर पाण्यातून जायचे होते त्यात काही मुलं मुदामून तिकडेच उडी मारण्यासाठी सांगायचे जिथे पाणी जास्त असेल कारण ते तर अगोदरच भिजत होते आणि आम्हाला पण भिजवायचे ठरवले होते. त्यात मी आणि महेश मात्र फसलो आणि छाती एवढ्या पाण्यांत भिजलो. मनात विचार आला सांधण ची वाट हि काही सोपी नाही पाहावे तर हि नागमोडी सारखीच आहे ती कधीही बदलू शकते आणि तसे दरवषी घडते सुद्धा.. दरवषी नवीन रस्ता काढणे म्हणजे कोळश्यातून हिरे शोधण्यासारखेचे आहे. सांधण ची वाट व त्यात असलेले छोटे व मोठे दगड हे आपली परीक्षाच घेत होते. आज मात्र मी खूप साऱ्या आठवणी सांधण मधून साठवून जात आहे.
थोडे अंतर पार केल्यानंतर रात्र होण्यापूर्वी आम्ही तंबू (टेन्ट) जवळ पोहचलो .. पण नंतर कळला आमचे टेन्ट अजून खाली आहे ती वेळ होती सायंकाळची ७ वाजताची .. मग आम्ही रात्रीच्या त्या काळ्या अंधारात मोबाइलच्या मंद प्रकाशात एकमेकांना मदत करत टेन्ट जवळ पोहचलो .. रात्रीचा ट्रेक करण्याची इच्छा पण इथे पूर्ण झाली. Finally आम्ही पोहचलो .. काही जणांच्या चेहऱ्यावर “हुश्श .. सुटलो एकदाच ” असे भाव होते.
रात्री जेवण झाल्यावर Camp Fire केले पण ते आम्ही नाही आमच्या बाजूच्या ट्रेक ग्रुप ने .. त्यादिवशी जणु आकाशाला चांदण्यांनी गवसणी घातल्यासारखेच वाटत होते, काही जण तर गप्पा मारत मारत कधी ते स्वतः झोपू गेले त्यांनाच कळले नाही. रात्री काही जण Camp Fire करत गाण्याच्या भेंड्या खेळत होते तर काही जण टेन्ट मध्ये गप्पा मारत होते. थोडा वेळ कॅम्प फायर जवळ थांबून मी झोपण्यासाठी गेलो.
भाग ३ – परतीचा प्रवास
सगळी ५.३० ला उठून सकाळच्या नैसर्गिक विधी आटपून चहा नाश्ता करून आम्ही डेहणे गावाकडे जाण्यासाठी निघालो. मोकळे रान असल्या कारणामुळे सूर्याची किरणे पडण्याआधी आम्हांला पोहोचायचे होते. त्यात WE ने डेहणे गावात मस्त जेवण्याची व्यवस्था करून ठेवली होती. त्यात आज veg -non veg असे दोन्ही प्रकारचे जेवण होते. मी आणि अजून काही जन डेहणे गावात लवकर आल्यामुळे आम्ही नदीच्या त्या छोट्या पाण्यात मज्जा करत होतो व बाकीच्यांची वाट पाहत राहिलो. त्यातच आम्ही सर्वानी ट्रेक चा फीडबॅक दिला .. नंतर पाण्यातून आल्यानंतर सर्वानी जेवणावर ताव मारला .. जेवण झाल्यानंतर आम्ही जीप ने आसनगाव कडे परतीचा प्रवास केला .
आसनगाव आल्यानंतर सगळ्यांना टाटा बाय बाय करत वळणावरती पुन्हा भेटू असे सांगत आम्ही सगळे मुंबई च्या फास्ट लाइफ कडे वळलो. मुंबई च्या फास्ट लाईफला सोडुन सह्याद्री चे असे रूप पाहणे माझ्यासाठी कधीही न विसरणारेच क्षण होते. काही तरी मागे राहिले असे जाणीव होतच होते पण पुन्हा सह्याद्रीला भेटू असे सांगत आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी.
भाग ४ – एक आठवण
एकंदर खुप मज्जा आली असं म्हण्यापेक्षा एक सुंदर जिवंत अनुभव जगायला मिळाला
विशेष आभार- Wanderers and Explorers (WE), Trek leaders- PD and Sandy and all Trek Members