गावाचा इतिहास
गावच्या पश्चिमेला राजूर रस्त्यावर ई.स १९१६ जीर्णोउधार केलेले महादेवाचे मंदिर आहे.मंदिराला अलीकडेच रंगकाम केल्याने ते अगदी नवीनच वाटते . महादेवाच्या मंदिरा शेजारी मुसळ दीव म्हणून एक स्थाभ आहे.दगडा पासून केलेले दोन नंदी व एक थडगे आहे.मुसळदेव,नंदी व थडगे किमान १००० वर्षापूर्वीचे असावेतयावरून गावची प्राचीनता लक्षात यते.
पूर्वी गावच्या परिसरात धामण या नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात असल्यने धामणगाव असे नाव पडले.धामण या वृक्षाला चैत्र महिन्यत पालवी फुटलेली असते.या काळात गावात चारा उपलब्ध नसतो.अश्या परीस्तीतीत शेळ्यांना चारा देणारा,औषधी गुणधर्म असेलेला ,शेतीच्या कामाला उपयुंक्त लाकूड पुरवणारा हा वृक्ष महत्वपूर्ण ठरतो.पर्यावर्णाचा समतोल बिगडल्याने सद्या वृक्षांची संख्या घटली आहे.गावच्या ईशान्य असलेल्या डोंगरावरून पाऊसाळ्यात वाहणारे पाणी अनेक नाले व ओढे यांच्या स्वरुपात मुळा नदीला जाऊन मिळते.पूर्वी ह्या ओढ्यनवर मातीचे बांध घालून,पाट काढून त्या पाटानच्या मदतीने गावच्या शेतीला पाणीपुरवटा केला जाई या पाटांची संख्या सुमारे ५० इतकी होती.पाटाच्या मदतीने पाणीपुरवटा करण्याच्या वैशीस्टायपूर्ण पद्धतीमुळे या गावाला धामणगाव पाट असे म्हणतात, विहिरींची संख्या वाढल्याने सद्या पाटांचा वापर कमी होतो.
मुख्य आकर्षण –
सिद्धेश्वर मंदिर –
सिद्धेश्वर महादेव मंदिर गावाच्या पश्चिमेस अगदी थोड्याच अंतरात मुख्य ओढ्याच्या काठावर सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर अत्यंत नयनरम्य आणि शांत आहे मंदिराच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या शिलालेखामध्ये सण 1956 मध्ये जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे
मंदिराच्या समोरच अत्यंत दुर्लभ आसा नांदुरखी चा वृक्ष आहे.सिद्धेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते
मुक्ताई मंदिर –
श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
मुक्ताई म्हणजेच ज्ञानेश्वरी मांउलींची बहिण.गावकर्यानची ग्रामदेवता आहे.चैत्र तृतीयेला मुक्ताई मंदिराची यात्रा असते.
मंदिर पुरातन झाले असल्यने काही वर्षांपुर्वी कै .म्हातारबा धोंडीबा भोर यांच्या जागेत मंदिराचा जीर्नौधार श्री. भागवत शेळके यांच्या पुढाकाराने करण्यात आला आहे.लेंडेवाडी या मंदिराच्या परिसराचे नाव मुक्ताई नगर असे करण्यात आले.
वनदेव डोंगर – ट्रेकिंग पॉइंट
गावातील मुख्य व्यवसाय : शेती
मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. गावाची रचना काहीशी डोंगराळ व उंचसखल आहे. जमीन मध्यम स्वरुपाची व निचर्याची आहे. माळरान शेती व बागायती शेती यांचे प्रमाण समान आहे. ऊस, भुईमुग, भातशेती, नागली, कडधान्य इ. चे पिक उत्तम येत असे. ऊस भरपूर असल्याने गुऱ्हाळे तसेच गुळाचा उप व्यवसाय चांगला होता. मागे उल्लेख केल्याप्रमाणे ओढया वरील वैशिष्टपुंर्ण अशा पाटांच्या द्वारे पाणी पुरवठा केला जात असे. ई.स.१९६०-१९७० पर्यंत हि व्यवस्था थोड्या फार फरकाने अशीच होती.१९७२ चा दुष्काळ, गावातील विहिरींची वाढती संख्या यामुळे ओढयांचे पाणी कमी झाल आहे. परिणामी हि व्यवस्था क्रमश: अस्तंगत होत आहे. गावगावातील एकूण १३४ विहिरी,१९९० च्या दरम्यान बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व सायफन द्वारे होत असलेला पाणीपुरवठा यामुळे बागायत क्षेत्र याचे प्रमाण वाढले आहे. वनदेवाच्या डोंगराजवळ असलेल्या पाझर तलावामुळे काही प्रमाणात शेतीला लाभ झाला आहे.नंतरच्या काळात सपाटी करणामुळे लागवड खालील क्षेत्र वाढले आहे. यामुळे शेती व्यवसायाच्या माध्यमातून गावाच्या विकासात मुलभूत सुधारणा झाली आहे. गावातील लोक पुर्वी इतर गावात मजुरी करण्यासाठी जात होते.परंतु शेतीत सुधारणा झाल्यामुळे आता गावात रोजगार उपलब्ध झाला आहे. टोम्याटो, कांदा, वालवड इ.पिकांचा चांगला दर्जा व भरपूर उत्पन्न यामुळे पावसाळ्यात बाहेरचे व्यापारी गावात माल गेण्यासाठी येतात. हि उत्पादने संगमनेरला तसेच मुंबई-पुण्याला पाठवली जातात.
गावातील उत्सव –
यात्रा- मुक्ताई आणि खंडोबा
हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह
शिव जयंती
शिक्षणाच्या सुविधा – अंगणवाडी ते १२ वी
- प्रशासकीय सेवा – ग्रामपंचायत, स्वस्त धान्य दुकान , सोसायटी, तलाठी कार्यालय
- नदी – मुळा नदी
- लोकसंख्या – 3000- 3500
- आरोग्य सेवा – खाजगी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य सेवा अंगणवाडी
- अकोले ते धामणगाव पाट – 13 कि मी
- प्रवाशी साधने – ST , Jeep
माहिती संकलन – सुरज नारायण भोर