रिचर्ड फाईनमन हा नोबेल विजेता शास्त्रज्ञ एक जिंदादिल, विज्ञान, कला यात रस असलेला मनुष्य.
एकदा त्याच्याकडे त्याचा कलाकार असलेला मित्र आला त्याने रिचर्डला एक फुल दाखवलं आणि म्हणाला “किती सुंदर आहे ना हे फुल ”
त्यावर रिचर्ड म्हणाला ” होय खरच सुंदर आहे”
त्याचा मित्र विनोद करण्याच्या मनस्तीतीत होता तो म्हणाला की तुम्ही विज्ञानाची लोकं खूप अरसिक असता तुम्हाला सुंदरता नीट समजून घेता येत नाही ”
त्यावर रिचर्ड ने खूप सुंदर उत्तर दिलं ” तू जी फुलांची सुंदरता पाहू शकतोस ती मी ही पण पाहू शकतो पण इतकंच नाही तर मी फुलाचा रंग, त्याच केशाकर्षण, त्याच परागसिंचन , सममिती , फुलाचं प्रजनन, पानातली हरीतलवकं इत्यादी फुलाच्या आतलं सौंदर्य सुद्धा बघू शकतो हे कदाचित तुला नाही दिसू शकत . हे सौंदर्य दिसण्यासाठी आपल्याला विज्ञानाची मदत घ्यावीच लागते.
काजव्यांच्या आयुष्याचं असच एक सौंदर्य आतलं सौंदर्य समजून घेणं महत्वाचं. म्हणजे आपल्याला असे प्रश्न पडायला हवेत की ते बिचारे राहतात कुठे? त्यांचं प्रकाश बाहेर टाकण्याचं कारण काय? ते नेमके कीटक आहेत की आणखी काही? जगतात नेमके किती दिवस? खातात काय ? ते व्हेज आहेत की नॉनव्हेज ? कपडे कुठले वापरत असतील ब्रॅण्डेड की साधे ? स्पोर्टशूज वापरतात की फॉर्मल शूज? कस असेल त्यांचं आयुष्य…….
आपण माणस एकमेकांशी संवाद साधतो तो कसा तर बोलून , हातवारे करून, डोळ्यांच्या हालचाली किंवा अगदी इमेल पासून व्हाट्सअप पर्यंत , फेसबुक पासून पत्रांपर्यंत अशी अनेक साधने वापरतो . तर प्राणी कसे एकमेकांशी संवाद करतात तर आवाजातून आता हा आवाज माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या पलीकडचाही असू शकतो, किंवा वासातुन , उष्णतेतून , किंवा काही किरणे सोडून ते एकमेकांशी संवाद साधतात. पण जे प्रान्यामधे ह्या क्षमता नाही त्यांनी कसा संवाद करायचा आणि जगायचं म्हणजे संवाद झालाच पाहिजे इथं परत निसर्ग उत्तर शोधतो ते म्हणजे प्रकाशाच …….
काजवे प्रकाशाद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. फक्त काजवेच नाहीत तर इतरही काही प्राणी आणि कीटक एकमेकांशी प्रकाशाद्वारे संवाद साधतात. तो संवाद कशासाठी तर एक तर मिलणासाठी किंवा दुसरा भक्षक आला तर त्याच्यासाठी . काजवे पिवळा , निळा, हिरवा, लाल रंगाचा प्रकाश बाहेर टाकतात. या प्रकाशाची तरंगलांबी ही पाचशे ते सहाशे नॅनोमिटरच्या दरम्यान असते. प्रकाशाचा रंग प्रजातीवर अवलंबून असतो. प्रकाश बाहेर टाकण्याचे ही अनेक प्रकार आहे . काही प्रजाती इंग्रजी J आकाराचा, तर काही फक्त एक टिंब आकाराचा तर काही दोन टिंब असे वेगवेगळे प्याटर्न पहायला मिळतात. काजवे ज्या अभिक्रियेतून प्रकाश सोडतात तिला बियोलुमिनिसेन्स अस म्हणतात . त्यात रासायनिक अभिक्रियेतून प्रकाश तयार केला जातो. ह्या अभिक्रियेसाठी लुसीफेरीन नावाचं घटक महत्वाचं काम करत. लुसीफेरीन आणि लुसिफिरेज यांच्या सोबत एटीपी परमाणू यांच्या संयोगातून हा प्रकाश तयार होतो या अभिक्रियेत ऑक्सिजन आणि मॅग्नेशियमही महत्वाची भूमिका बजावतात. नायट्रिक ओकसाइड हे प्रकाशावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करत. ही सगळी अभिक्रिया काजव्यांच्या शरीराच्या शेवटच्या भागात होत असते इंग्रजीत त्याला ऍबडोमेन म्हणतात .काजव्यांचा प्रकाश शीत प्रकारचा असून त्या प्रकाशाची एफिशिएनसी किंवा कार्यक्षमता ही शंभर टक्के असते. विजेच्या दिव्याची कार्यक्षमता ही चाळीस ते साठ टक्के असते. याच सोपं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण लाकूड जाळतो तेव्हा उष्णता मिळवणं हा हेतू असतो पण उष्णतेसोबत काही वायू,प्रकाश, राख हे घटकही बाहेर पडतात त्यामुळे इफिशियनसी कमी होते. काजव्यामध्ये जितकी रसायन एकत्र येतात त्या सगळ्याच रूपांतर प्रकाशात होत इतर घटक बाहेर पडत नाहीत. त्यामुळे हा प्रकाश जगातील सगळ्यात जास्त इफिशिएन्ट प्रकाश आहे. निसर्ग आपल्याला परत एकदा आपल्या मर्यादेची जाणीव करून देतो की आपण माणसं त्यानीच निर्मिलेली कलाकृती आहोत आणि निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. मादीला मिळवण्यासाठी नर काजवे प्रकाश सोडतात ज्याचा प्रकाश जास्त तो नर मादी निवडते. त्यामुळे नर एकमेकांशी प्रकाशाद्वारे स्पर्धा करतात. प्रकाशाच्या रंगावरून मादीला आपल्या जातीतील नर ओळखता येतो. आपला जोडीदार निवडीच स्वातंत्र्य हे मादीला असत.
काजव्यांच्या जगभरात दोन हजार जाती आहेत. यापैकी सात ते आठ जाती भारतात आढळतात. काजव्यांचा कीटकांच्या कॉलियोपटेरा कुळात समावेश होतो. दरवर्षी मे ते जूनच्या दरम्यान काजव्यांचा मिलनाचा कालावधी असतो. मिलनानन्तर नर काही दिवसात नर मरून जातो तसच मादी जमिनीखाली अंडी घालते व तीही मरून जाते. तीन ते चार आठवड्यात अंड्यातुन अळी बाहेर पडते. काजव्याच आयुष्य अंडी, अळी, प्रौढ या चक्रातून जात. अंड्यातून अळी बाहेर पडली की वर्षभर काजवे अळी या स्थितीत राहतात. शेवटी काही दिवस प्रौढ होतात व चमकू लागतात. साधारण पाणथळ जागी काजवे मोठ्या संख्येत वाढतात. साधारण असा समज आहे की काजवे जेव्हा जन्मतात तेव्हा चमकतात पण ते चूक आहे. ते जेव्हा प्रौढ होतात तेव्हाच चमकतात. कुठल्याही प्राण्याचं आयुष्याचा हेतू हा जेनेटिक माहिती पुढच्या पिढीला देने हा असतो . काजवे जेनेटिक माहिती पुढच्या पिढीला देतात व मरून जातात.
आता काजवे खातात काय ? …..काजव्यांच्या खाण्याच्या वेगवेगळ्या सवयी आहेत. अगदी फुलाच्या परागकणापासून ते जमिनीतील इतर कीटक ते गोगलगायी पर्यँत अनेक गोष्टी काजवे खातात . आता काजवा साधारण दोन ते तीन सेंटीमीटर तो त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या गोगलगायीची शिकार कशी करू शकतो ? तर काजव्यांच्या डोक्याला दोन शेंड्या असतात .या शेंड्यामधून एक प्रकारचं विष गोगलगायीच्या शरीरात सोडतात गोगलगाय मरून जाते आणि काजवा तिच्यावर ताव मारतो. या विषाचा वापर करून एक प्रकारचा वास तयार करतात जेणेकरून त्यांचा भक्षक दूर निघून जावा. काजवे हे स्वजातिभक्षक देखील आहेत.
काजवे मिमिक्री करतात का ?…… तर होय काजवे मिमिक्री देखील करतात . एका जातीची मादी दुसऱ्या जातीच्या नराच्या प्रकाशाची मिमिक्री किंवा कॉपी करते .नराला वाटतं की ही आपल्यावर इंप्रेस झाली नर मादीजवळ जातो आणि मादी त्याला खाऊन टाकते. एका जातीची मादी आपल्याहून दुसऱ्या जातीच्या नराला खाऊन टाकते.
काजवे उडू शकतात का ?….. तर होय काजवे उडू शकतात पण काही न उडणाऱ्या प्रकारचे देखील काजवे जगात आहेत. काही जातींमध्ये अगदी अळी असल्यापासून प्रकाश सोडला जातो तर काहींमध्ये प्रौढ झाल्यावर… उडण्यासाठी त्यांना पंखाच्या दोन जोड्या असतात. वरची जोडी खालच्या जोडीला झाकून टाकते. बिटल जातीच्या कीटकांमध्ये सगळ्यात वरचे पंख हे आतल्या पंखाना झाकून टाकतात त्याच गणात काजव्यांचा समावेश होतो.